अपडेटतंत्रज्ञान

डिजिटल युगात सायबर विमा महत्वाचा…

Share this post

जग इंटरनेट तंत्रज्ञानासह वेगाने पुढे जात असताना अनेक अडचणी देखील आता डोकं वर काढू लागल्या आहेत. बहुतांश लोक त्यांची अनेक कामे आता ऑनलाईन करण्याच्या प्रयत्नात असतात. कुणाला पैसे पाठवायचे असतील किंवा आयकर भरायचा असेल अशा असंख्य कामासाठी इंटरनेटचा वापर केला जातो.याचा फायदा हॅकर घेतात.

हे हॅकर खरे दिसणारे बनावट संदेश पाठवून लाखो लोकांची फसवणूक करतात. लोकही फसवणूक करणाऱ्यांना बळी पडतात आणि आयुष्यभराची कमाई गमावतात. सायबर फसवणुकीपासून आपल्या आयुष्यभराच्या कमाईचे संरक्षण करण्यासाठी सायबर विमा महत्त्वाचा आहे.

सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि नुकसान भरून काढण्यासाठी सायबर विमा खूप उपयुक्त आहे. यामुळेच आज आरोग्य आणि जीवन विम्यासोबत सायबर विमा घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या विमा पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाला अनेक प्रकारचे सायबर गुन्हे आणि फसवणुकीपासून संरक्षण दिले जाते. तुमच्याकडे सायबर विमा असल्यास तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची भरपाई करू शकता.

जर आपले बँक खाते, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा तुमचे ई-वॉलेट वापरून फसवणूक करून ऑनलाइन शॉपिंग केली गेली असेल, तर विमा कंपनी त्याची भरपाई करते. फिशिंग आणि ईमेल स्पूफिंग यांसारख्या सायबर गुन्ह्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईही विमा कंपनी करते. सायबर विमा कोणत्याही सायबर फसवणूक, डेटा चोरी, सायबर हल्ला, रॅन्समवेअर हल्ला आणि ब्लॅकमेलिंगमधून रिकव्हरीच्या बाबतीत तुमची आर्थिक जोखीम कमी करते.

केंद्र सरकारने डिजिटल डेटाची सुरक्षा आवश्यक मानली असून डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2022 चा मसुदा जारी करण्यात आला आहे. डिजिटल वैयक्तिक डेटाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलण्याच्या तरतुदी आहेत. सायबर विमा सायबर धोक्यांपासून सुरक्षा कवच प्रदान करते. सरकारी आकडेवारीनुसार जून 2022 पर्यंत भारतात 6.7 लाखांहून अधिक सायबर सुरक्षा प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

सायबर विमा पॉलिसी 10 ते 15 प्रकारच्या सायबर धोक्यांपासून संरक्षण प्रदान करते. आपल्याला उच्च मर्यादा आवश्यक असेल. विमा कंपन्या 50 हजार ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कव्हरेज देतात.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *