ट्रक व चारचाकी यांच्यात भीषण अपघात.
दिनांक २/११/२०२३ रोजी रोहिणी ता.चाळीसगांव जि.जळगांव गावापासून जवळच होंडा सिटी कार व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.
अनिल पंडित कापडणीस (वय ३८ राहणार आसखेडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक) हे नांदगाव कडून चाळीसगाव कडे जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रक व त्यांच्या कार मध्ये जबर धडक झाली. ही धडक एवढी जबर होती अक्षरशा कारचा चुरा झाला आहे. ट्रक ही इंदूर कडून बेंगलोर जात होती.अनिल कापडणीस हे गाडीमध्ये एकटेच होते.
