अपडेटक्रीडा

टीम इंडियाने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला केलं पराभूत, मालिकाही जिंकली…

Share this post

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच टी-२० सामन्याची मालिका सुरु आहे. मालिकेच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिकेतील चौथा सामना जिंकत मालिका जिंकली.

टीम इंडियाने टी-२० मालिकेच्या चौथ्या सामन्यात २० षटकात ९ गडी गमावून १७४ धावा केल्या. टीम इंडियाने दिलेल्या १७५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. ट्रेव्हिस हेड आणि जोशने चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी रचली.ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का जोशच्या रुपात बसला.जोशने ७ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. काही वेळेनंतर हेडही तंबूत परतला. हेडने १६ चेंडूत ३१ धावा केल्या. त्यानंतर हार्डीला अक्षरने बोल्ड केले. तर बेन फक्त १९ धावा करू शकला. टिम डेव्हिडने २० चेंडूत १९ धावा करून तंबूत परतला. मॅथ्यू शॉर्ट १९ चेंडूत २२ धावा करून बाद झाला .

ऑस्ट्रेलिया २० षटकात ७ गडी गमावून १५४ धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाने २० धावांनी सामना जिंकला. टीम इंडियासाठी अक्षर पटेलने ३ गडी बाद केले. तर दीपक चहरने २ गडी बाद केले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *