अपडेटक्रीडा

टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली…

Share this post

भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारताने शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला आहे. धरमशाला येथे खेळलेला हा सामना अवघ्या तीन दिवसांत संपला.

रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पराभव केला. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारताने ही मालिका ४-१ ने जिंकली.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 57.4 षटकात 218 धावांवर आटोपला. भारताकडून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने पहिल्या डावात पाच बळी घेतले, तर शंभरावी कसोटी खेळत असलेल्या रविचंद्रन अश्विननेही चार बळी घेतले, रवींद्र जडेजाला एक बळी मिळाला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावा केल्या.

टीम इंडियाच्या पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शानदार शतके करत केलेली 171 धावांची भागीदारी त्यानंतर सर्फराझ खान व देवदत्त पडिक्कल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 477 धावापर्यंत मजल मारली.

दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली आणि दुसऱ्याच षटकात अश्विनने बेन डकेटला (2) धावसंख्येवर बाद केले. यानंतर सहाव्या षटकात 21 धावांवर जॅक क्रॉली खाते न उघडता बाद झाला आणि तोही अश्विनने घेतला. यानंतर अश्विनने 10व्या षटकात 36 धावांवर ऑली पोप (19) यालाही बाद केले.येथून जॉनी बेअरस्टोने (31 चेंडूत 39) वेगवान खेळी खेळली आणि जो रुटसोबत चौथ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली, मात्र 18व्या षटकात कुलदीप यादवने बेअरस्टोला धावांवर बाद करून इंग्लंडला चौथा धक्का दिला. यानंतर, उपाहारापूर्वी, बेन स्टोक्स (2) देखील 23व्या षटकात आऊट झाला. अश्विनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यांचा डाव 195 धावांवर आटोपला. उपाहारानंतर खेळ सुरू झाला तेव्हा अश्विनने बेन फॉक्सला क्लीन बोल्ड केले. या विकेटसह अश्विनने आपली शंभरवी कसोटी खेळत डावात पाच बळीही पूर्ण केले. कसोटीत पाच बळी घेणारा हा त्याचा 36वा सामना आहे.

यानंतर बुमराहने एकाच षटकात 2 बळी घेत इंग्लंडला पराभवाच्या दिशेने ढकलले. मात्र, या सगळ्यात जो रूटने एक टोक पकडून अर्धशतक झळकावले. 84 धावा करून तो शेवटचा विकेट म्हणून बाद झाला.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *