अपडेटक्रीडा

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय…

Share this post

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमारच्या नेतृत्वात तिसरा सामना जिंकून टी-२० मध्ये आपला ऐतिहासिक विजय नोंदवला.

भारतआणि दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर मालिकेचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने ५ विकेटने जिंकला. मालिकेचा तिसरा सामना करो या मरो असा होता. याच सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादवने जबरदस्त खेळी दाखवली.

टीम इंडियाला प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर सूर्यकुमारने जोरदार फटकेबाजी केली. सूर्यकुमाने शतक ठोकत, भारताने दक्षिण आफ्रिकेला २०२ धावांचं आव्हान दिलं.

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ९५ धावांवर लोटांगण घातलं. कुलदीपने २.५ षटकात १७ धावा देऊन ५ गडी बाद केले. तर रविंद्र जडेजाने दोन गडी बाद केले. अर्शदीप आणि मुकेश कुमारने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

टीम इंडियाने विजयाबरोबरच मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *