टाटा पंच EV एका चार्जमध्ये धावते 421 किमी…
टाटा मोटर्सने एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये आपली मोस्ट अवेटेड इलेक्ट्रिक एसयूव्ही पंच इव्ही लाँच केली आहे. विशेष म्हणजे या कारची किंमत अवघी 11.99 लाख रुपये असून सिंगल चार्जमध्ये या कारची सर्टिफाइड रेंज 421Km आहे.कंपनीने ही कार दोन बॅटरी पॅक ऑप्शनमध्ये लाँच केली आहे. यामध्ये 25kWh आणि 35kWh हे दोन ऑप्शन मिळतात. या कारची डिलीव्हरी 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
टाटा पंच EV मध्ये अनेक इलिमेंट गे नेक्सन EV मधील देण्यात आले आहेत नेक्सॉन प्रमाणेच फेसलिफ्टमुळ एलइडी लाइट बार देण्यात आला आहे. एक्सटीरियर फिचरमध्ये फ्रंट बंपरला इंटीग्रेटेड स्लिट एलइडी हेडलाइट्स, व्हर्टिकल स्ट्रेक्स मध्ये रिडिझाइन करण्यात आलेलं लोअर बंपर आणि एख सिल्व्हर फॉक्स स्किड प्लेट देण्यात आली आहे.
टाटा पंच EV मध्ये कंपनीने दोन बॅटरी पॅक ऑप्शन दिले आहेत. यामध्ये 25kWh आणि 35kWh बॅटरी पॅकसोबत दोन चार्जिंग ऑप्शन्स देखील मिळत आहेत. यामध्ये पहिला 7.2 किलोवॅट फास्ट होम चार्जर (एलआर व्हेरियंटसाठी) तर दुसरे 3.3 किलोवॅट वॉलबॉक्स चार्जर मिळतो. 25kWh बॅटरी पॅकची सर्टिफाइड रेंज 421Km तर 35kWh बॅटरी पॅक सर्टिफाइट रेंज 315Km इतकी आहे.
टाटा पंच EV ही कार न्यू डेडिकेटेड acti.ev प्यूअर इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. तसेच यामध्ये 14 लिटर फ्रँक (फ्रंट ट्रंक) देखील देण्यात आली आहे.पंच EV मध्ये ड्युअल-टोन इंटीरियर थीम, प्रीमियम फिनिशसह फ्रेश सीट अपहोल्स्ट्री, टाटा लोगो असलेले दोन स्पोक स्टीअरिंग व्हील आणि एक मोठा इन्फोटेनमेंट स्क्रीन दिली आहे.
या कारमध्ये इलेक्ट्रिक कारमध्ये 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये 10.25 इंचाची डिजीटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि दोन स्पोक स्टीअरिंग व्हील देखील आहेत. तसेच ही इव्ही 10 ते 80 टक्क्यांपर्यंत 56 मिनीटांत कोणत्याही 50Kw च्या डीसी फास्ट चार्जरने चार्ज केली जाऊ शकते.
यामध्ये वॉटरप्रूफ बॅटरी देण्यात आली आहे, ज्याला आठ वर्षांची किंवा 1,60,000 Km ची वॉरंटी दिली जात आहे. यासाठी पाच ड्युअल-टोन कलर ऑप्शन देण्यात आले आहेत, तसेच लाँग रेंजमध्ये तीन ट्रिम देण्यात आलेत, अॅडव्हेंचर, एम्पावर्ड आणि एम्पावर्ड प्लस यामझ्ये ड्युअल टोन कलर ऑप्शन मिळतो.
सेफ्टीबद्दल बोलायचे झाले तार टाटा पंच EVमध्ये सहा इअरबॅग्स, एबीएस, इएससी, इएसपी, क्रूज कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमरा सारखे स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहेत.