ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर…
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे; तर राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे.


