जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं ३० तारखेला उद्घाटन…
जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन येत्या ३० तारखेला होणार आहे. जालना रेल्वे स्थानकावरून सकाळी अकरा वाजता या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं जाईल.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती आज दिली. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जालना इथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन रेल्वेगाडीमुळे प्रवाशांना जलदगतीनं प्रवास करता येणार असल्यानं वेळेची बचत होणार आहे, असं ते म्हणाले.
