अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी सामाजिक न्याय विभागाची विशेष मोहीम…

Share this post

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समता पंधरवड्याअंतर्गत २०२३-२४ मध्ये बारावी विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र लवकर आणि कमी कागदपत्रांशिवाय मिळणार आहे.

विविध अभ्यासक्रमासाठी जसे की एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एमबीए, पी.एचडी, बीएस्सी अॅग्री, बी-फार्म, बीएस्सी नर्सिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक असते. मागासवर्गीय विद्यार्थांना सांविधानिक आरक्षणातून लाभ मिळत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बार्टी च्या https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.

अर्जासोबत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालयाचे शिफारस पत्र, शपथपत्र अशा पुराव्याच्या साक्षांकित प्रती जोडून जात पडताळणीचा परिपूर्ण अर्ज वेळेत सादर करावा. अर्ज वेळेत सादर न केल्यास विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी वंचित राहण्याची शक्यता आहे.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या व त्रुटी अभावी अर्ज प्रलंबित असलेल्यांना समितीने मोबाइल, ई-मेलद्वारे संदेश पाठवले आहेत. संबंधित अर्जदारांनी देण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रांसह त्रुटी पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हा जात पडताळणी कार्यालयात उपस्थित रहावे. महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांनी जात पडताळणी प्रस्ताव कार्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *