जलद रिफंड मिळवण्यासाठी प्रगत IEC 3.0 प्रणाली सुरु, इनकम टॅक्स विभागाचा मोठा निर्णय
टॅक्स विभाग लवकरच नवीन IEC 3.0 प्रणाली सुरु करणार आहे. आधीचे IEC 2.0 ( इंटिग्रेटेड ई-फायलिंग अँड सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर ) याचा कार्यकाळ संपत असून आधीच्या IEC 2.0 ची जागा आता IEC 3.0 घेणार आहे. त्यामुळे करदात्यांसाठी ई-फायलिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर होऊन , जलद रिफंड मिळण्यास सोपे जाईल.
IEC हे प्रगत ई-फायलिंग प्लॅटफॉर्म सुरु केला असून , त्यामध्ये करदात्यांना आपला आयटीआर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरता येतो. यामध्ये नियमित फॉर्म जमा करण्याची सुविधा आहे . त्याचसोबत तुम्ही इतर सेवांचा वापर करू शकता. याचा महत्वाचा भाग म्हणजे सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) हा असून , याच्या माध्यमातून ई-फायलिंग पोर्टल आणि इंटिग्रेटेड टॅक्सपेयर डेटा बेसवरून भरलेल्या रिटर्न्सवर प्रक्रिया करते. त्यासोबतच आयईसी प्रकल्प क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी बॅक ऑफिस पोर्टल देखील समाविष्ट आहे , ज्यातून अधिकारी करदात्यांच्या फाइलिंग आणि प्रोसेसिंग डेटामध्ये प्रवेश करू शकतात.
नवीन IEC 3.0 चा मुख्य उद्देश अधिक प्रगत आणि चांगले व्यवस्थापन उभारण्याचे आहे . या आयटीआर प्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गती दिली जाईल, ज्यामुळे करदात्यांना जलद रिफंड मिळण्यास मदत होईल. या नवीन प्रणालीच्या वापरामुळे आधीच्या प्रणालीतील त्रुटी कमी होतील.

