जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद…
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दहशतवाद्यांमध्ये लष्कर कमांडर कारीचाही समावेश आहे. मात्र, या चकमकीत लष्कराचे ५ जवानही शहीद झाले आहे.
राजौरी येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पाठवण्यात आले होते. ठार झालेले दोन्ही दहशतवादी आयईडी बनवण्यात आणि ऑपरेट करण्यात माहीर होते. याशिवाय हे दोघेही लपून बसले होते.कारी असे मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याचे नाव असून तो लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर आहे. त्याला पाकिस्तान आणि अफगाण आघाडीवर प्रशिक्षण देण्यात आले आहे. कारी हा पाकिस्तानचा नागरिक असून तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. कारी हा डांगरी आणि कांडी हल्ल्याचा मास्टरमाईंडही मानला जातो. गेल्या एक वर्षापासून कारी आपल्या ग्रुपसोबत जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पूंछमध्ये सक्रिय होता.
जम्मू-काश्मीर पोलिस यांच्यामार्फत संयुक्त शोधमोहीम राबविण्यात आली. त्यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये तुंबळ चकमक झाली. या दहशतवाद्यांचा नेमका ठावठिकाणा निश्चित झाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोहीम राबवली. त्यानंतर तेथे दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. मात्र, चकमक झालेल्या भागात नागरिकही होते. त्यातील महिला आणि मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात कॅप्टन मवी प्रांजल (मँगलोर, कर्नाटक), कॅप्टन शुभम गुप्ता (आगरा, यूपी), हवालदार अब्दुल माजिद (पुंछ, जम्मू कश्मीर), लांस नायक संजय बिस्ट (उत्तराखंड) आणि पैराट्रूपर सचिन लौर (अलीगढ, यूपी ) जवान हुतात्मा झाले .
#OpSOLKI
— NORTHERN COMMAND – INDIAN ARMY (@NorthernComd_IA) November 24, 2023
In a solemn wreath-laying ceremony, #LtGenUpendraDwivedi, #ArmyCdrNC at Jammu and #LtGenAnindyaSengupta, #COS_NC at #Poonch paid homage to Capt Shubham Gupta, Capt MV Pranjal, Hav Abdul Majid, L/Nk Sanjay Bisht & Ptr Sachin Laur who sacrificed their lives in the service… https://t.co/jDIkICBUAd pic.twitter.com/WtHDB5RKxx

