छत्रपती संभाजीराजेंनी केली नवीन राजकीय पक्षाची नोंदणी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अगदी तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी वेगाने घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काही पक्षांकडून उमेदवाराच्या नावाच्या अधिकृत नावाची घोषणा होताना देखील दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा उदय झालेला आहे. आणि या राजकीय पक्षाची निवडणूक आयोगाने नोंदणी देखील झाली असेल. त्यांनी चिन्ह देखील ठरवलेले आहे.
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी फेसबुक वर एक पोस्ट करून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नोंदणी केली असल्याची माहिती दिलेली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला सप्तकीरणांसह पिनाची निब हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. याबाबत बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवली आहे. आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील मतदारांपर्यंत पोहोचवणे, हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, संघटनेचे कार्यकर्ते आणि हितचिंतकाचे कष्ट त्यामुळे राज्याच्या राजकारणाला असलेली एक नवीन आणि सुसंस्कृत पर्यायाची माग आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत परिवर्तन महाशक्ती घेऊन जाईल हे निश्चित जय स्वराज्य.”
छत्रपती संभाजीराजांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना केलेली होती. आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या पक्षाचे अधिकृत रित्या नोंदणी देखील केलेली आहे. आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हे त्यांच्या पक्षाचे नाव देखील जाहीर केलेले आहे.