अपडेटछत्रपती संभाजी नगरदुर्घटना

छत्रपती संभाजीनगर मधील कारखान्यात आग लागून सहा कामगारांचा मृत्यू…

Share this post

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज औद्योगिक वसाहतीत हातमोजे आणि रबरशी संबंधित साहित्य तयार करणाऱ्या सनशाइन या कंपनीला मध्यरात्री लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ कामगारांना वाचवण्यात यश आले असून त्यातील तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे कामगार रात्रीच्या वेळी कारखान्यात झोपले होते.

या घटनेची माहिती मिळताच अग्रिशमन दल तात्काल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. सकाळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

पदमपुरा अग्निशमन दलाचे कर्तव्यावर असलेले अधिकारी वैभव बाकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीतील मुश्ताक शेख (६५), कौसर शेख (७२), इकबाल शेख (१८), ललनची (५५), रियाज भाई (३२), मरगुब शेख (३३, सर्व रा. बिहार) यांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला. तर दिलीप कुमार लुटकन पठाण, सुशाशिष हलहार, हैदर शेख, अफरोज शेख, मिसबा ऊल शेख, दिलाहत शेख व हसन शेख या आठ जखमींना अग्निशमन दलातील विनायक कदम व सहकार्‍यांच्या पथकाने बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) हलवण्यात आल्याची माहिती वैभव बाकडे यांनी दिली.

आग नेमकी कशाने लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी औद्योगिक वसाहतीतील हातमोजे आणि रबरचे साहित्य तयार करणाऱ्या कंपनीचे नाव सनशाइन एंटरप्राइजेस असल्याचे कळते. वाळूज एमआयडीसीमध्ये असलेल्या या कंपनीत २० ते २५ कामगार काम करतात. यापैकी १० कामगार हे रात्रीच्या वेळी कंपनीतच राहायचे. यापैकी चार कामगारांनी स्वतःची सुटका करून घेतली मात्र इतर कामगारांना बाहेर पडता आले नाही.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *