अपडेटआंतराष्ट्रीय

चीनमध्ये मध्यरात्री मोठा भूकंप,आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू…

Share this post

भारताच्या सीमेला लागून असलेल्या चीनमध्ये सोमवारी १८ डिसेंबर मध्यरात्री सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने शेकडो इमारतींची पझझड झाली. या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत १११ चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

चीनच्या गासू प्रांतात हा भूकंप झाला आहे. घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. तर त्याची खोली अंदाजे १० किलोमीटर इतकी होती.

भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याने चीनच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने स्तर-IV आपत्ती निवारण आणीबाणी घोषित केली आहे.आपत्तीच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि स्थानिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी चीनकडून एक टास्क फोर्स बाधित भागात पाठवण्यात आली आहे. या स्टास्कफोर्सने मंगळवारी पहाटेपासूनच बचावकार्य वेगाने सुरू केले आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *