चीनमधल्या गूढ आजारामुळे केंद्र सरकारचा रुग्णालयाच्या तयारीबाबत आढावा घेण्याचा दिला सल्ला…
चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या गूढ आजाराने जगाचं टेंशन वाढवलं आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमध्ये न्यूमोनिया सारख्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना भारत सरकारन सतर्क होत कठोर पावलं उचलली आहेत. केंद्राने आता राज्यांना रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनानंतर चीनमध्ये सुरू झालेल्या नव्या रहस्यमय आजाराने जगातील अनेक देशांना हैराण करुन सोडलं आहे. या आजाराने लहान मुलांना सर्वाधिक लक्ष्य केलं आहे. चिनी सरकारने अनेक शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आता भारतातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या आजाराचा सामना करण्यासाठी कोरोना सारख्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही, फक्त नियमांचे पालन करा, असेही त्यात म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या कुठलाही धोका भारतामध्ये नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही,” असे मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
Union Health Ministry decides to proactively review preparedness measures against respiratory illnesses in view of emerging public health situation in China. Advises States/UTs to immediately review public health and hospital preparedness measures. All States/UTs to implement… pic.twitter.com/Q6RNymrmfS
— ANI (@ANI) November 26, 2023

