चाळीसगाव पोस्ट ऑफिस मध्ये अनोखी दिवाळी साजरी…
रिक्रिएशन क्लबच्या सदस्यांनी सजवले चाळीसगाव पोस्ट ऑफिस.
सध्या संपूर्ण देशामध्ये दिवाळीची धुमधाम सुरू आहे. दिवाळीनिमित्त घराची साफसफाई केली जाते, फराळ, मिठाई तयार केले जातात व नातेवाईक मित्रमंडळींना देत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात येतात.
सध्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोस्ट ऑफिस ची चर्चा परिसरात होताना दिसते आहे. दिवाळीनिमित्त चाळीसगावच्या पोस्ट ऑफिसचे एक वेगळं रूप बघायला मिळत आहे.रिक्रिएशन क्लबच्या सदस्यांनी दिवाळीनिमित्त चाळीसगाव पोस्ट ऑफिस ची सफाई करत संपूर्ण कार्यालय सजवलेले आहे.

पोस्ट ऑफिस बाहेरचा परिसर रांगोळी व दिव्यांच्या माध्यमातून सजवण्यात आलेला आहे.चाळीसगाव पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांनी रिक्रिएशन क्लबची स्थापना केली असून या क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. रिक्रिएशन क्लब ची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण होत आहे. या क्लबच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त पोस्ट ऑफिसची सफाई,सजावट व सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मिठाई व भेट वस्तू देण्यात येते.


ही अनोखी दिवाळी साजरी करण्यासाठी पोस्ट ऑफिस मधील पोस्टमास्टर भागवत आहिरे असिस्टंट पोस्ट मास्टर विक्रांत बडके व रिक्रिएशन क्लबचे सेक्रेटरी रमेश माळी यांनी मेहनत घेऊन यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी साजरी करण्यात आली.