चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिणे धोकेदायक.
चहा बनवल्यानंतर तो थंड झाला व पुन्हा त्याला गरम करून जर आपण पीत असाल तर सावधान.
चहा जर तीन तासापेक्षा जास्त वेळ थंड असेल व आपण पुन्हा त्याला गरम करत असाल तर त्या चहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया वाढायला सुरवात होते. दुधाचा चहा आपण जर पीत असाल तर त्यात बॅक्टेरिया अतिशय जलद गतीने वाढतात त्यामुळे तिचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
हर्बल चहा जर आपण घेत असाल तर पहिल्या वेळेस तयार केल्यानंतरच त्याला तात्काळ घ्यायला हवे, जर आपण तो थंड करून पुन्हा गरम करून पीत असाल तर त्यामध्ये असलेले पौष्टिक घटक निघून जातात.
जर असाच चहा आपण नेहमी नेहमी पीत राहिलात तर आपल्याला पोटाचे आजार होऊ शकतात त्यात आपले पचन संस्था देखील खराब होऊ शकते.

