चंद्रपुरात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू…
चंद्रपुरात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुदानीत खाजगी जिजामाता निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण झाला आहे.
सहा दिवसांपासून या विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याचे मुख्याध्यापकाने पालकांपासून लपवले होते.
मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथे ही निवासी आश्रमशाळा आहे. अहेरी येथील मितल कोंडगुर्ले हिची प्रकृती खालावली असताना सहा दिवसांपासून पालकांना याची सूचनाच दिली नसल्याचे उघड झाले. अखेर रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्यानंतर पालकांना माहिती दिल्यावर त्यांना धक्का बसला.
त्यानंतर रुग्णालयात दाखल असल्याचे व उपचार सुरू असल्याचा खोटा निरोप दिल्याने पालक भडकले. प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मुख्यध्यापकाला चोप दिला. कार्यकर्त्यांनी आश्रमशाळा व्यवस्थापनाला जाब विचारत प्रशासनाकडे आश्रमशाळेची मान्यता तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
