घरात किती रोकड ठेवू शकतात ? समजून घ्या आयकरचा नियम…
घरी रोख रक्कम ठेवणे दोन गोष्टींवर अवलंबून असते, पहिली तुमची आर्थिक क्षमता आणि दुसरी म्हणजे तुमच्या व्यवहाराची सवय. जर तुम्ही घरी मोठ्या प्रमाणात रोकड ठेवत असाल तर याबात नियम समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास सहन कारवाया लागणार नाही.
इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार तुम्ही तुमच्या घरात कितीही रोख ठेवू शकता, पण जर तपास यंत्रणेची धाड पकडली तर तुम्हाला त्याचा स्रोत सांगावा लागेल. जर तुम्ही ते पैसे कायदेशीररित्या कमावले असतील आणि त्यासाठी पूर्ण कागदपत्रे तुमच्याकडे असतील किंवा आयकर रिटर्न भरला असेल, तर घाबरण्याची गरज नाही. परंतु आपण स्त्रोत सांगण्यास सक्षम नसल्यास आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकते.
जर तुम्ही आयकर विभागाला रोखीचा हिशोब देण्यात अपयशी ठरला तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. आयकर विभागाने तुमच्या घरवाड धाड टाकली आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. यासोबतच, जर तुम्ही त्या रोख रकमेबाबत योग्य माहिती देऊ शकला नाहीत, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तुमच्याकडून वसूल केलेल्या रोख रकमेवर त्या रकमेच्या १३७% पर्यंत कर आकारला जाऊ शकतो. एकंदरीत तुमच्याकडे ठेवलेली रोख रक्कम हातून तर जाईलच पण त्यावर तुम्हाला अतिरिक्त करही भरावा लागेल.
घर-फ्लॅट, गाडी किंवा लग्नाच्या वेळी अनेकदा मोठे व्यवहार करावे लागते, त्यामुळे या प्रकारचे व्यवहार करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला एकावेळी बँकेत ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायसाठी किंवा जमा करण्यासाठी पॅनकार्ड दाखवावे लागेल. तसेच खरेदीच्या प्रकरणात २ लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणे शक्य नसून इथेही तुम्हाला पॅन आणि आधार बंधनकारक असतो.
जर तुम्ही एका वर्षात तुमच्या बँक खात्यात २० लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली, तर तुम्हाला बँकेत पॅन आणि आधार दाखवावा लागेल. जर तुम्ही बँकेतून २ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली तर तुम्हाला टीडीएस प्रमाणपत्र द्यावे लागेल. दुसरीकडे, ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेची रोख खरेदी आणि विक्री केल्यास ती व्यक्ती तपास यंत्रणेच्या रडारवर येऊ शकते.
