घरबसल्या करा लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेची सध्या राज्यभर चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून आता पात्र असलेल्या महिलांना दर महिन्यातील दीड हजार रुपये सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
या योजनेचे अर्ज भरण्याची लगबग चालू झालेली आहे. त्यासाठी कागदपत्रे देखील जमा करत आहेत. आता आपण या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? त्याचप्रमाणे अर्ज कसा भरावा? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचा अर्ज तुम्ही आता तुमच्या मोबाईलद्वारे देखील भरू शकता. चला तर जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत.
अर्ज भरण्याची पद्धत जाणून घ्या…
मुख्यमंत्री लाडली बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करायचा आहे.
ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा.या ॲपवर आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ओटीपी आणि टर्म अँड कंडिशन यावर क्लिक करा आणि एप्लीकेशनला लॉगिन करा.
तुमच्यासमोर एक प्रोफाईल अपडेट करा असा ऑप्शन दिसेल.
यामध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण नाव, ईमेल आयडी, तुमचा तालुका, जिल्हा त्याचप्रमाणे तुम्ही गृहिणी आहात ग्रामसेवक आहात की आणखी काही आहात या सगळ्याची माहिती भरायची आहे.
यानंतर आता तुम्हाला नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.परंतु हे करताना तुम्हाला सगळ्यात आधी या एप्लीकेशनला लोकेशनची परमिशन द्यावी लागेल.
त्यानंतर तुमच्या समोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म येईल हा फॉर्म तुम्ही न चुकता भरायचा आहे. यावर तुमचा आधार कार्डवर जी माहिती आहे. तीच माहिती येथे टाकायची आहे.यावर तुम्हाला आधार कार्डवरील तुमचे नाव, जन्मतारीख पती किंवा वडिलांचे नाव, तुमचे गाव, तालुका जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे.
त्याचप्रमाणे तुम्ही जर शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसाल, तर नाही या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती काय आहे?हे टाकायचे आहे.तसेच तुमचे लग्न आधीचे संपूर्ण नाव तेथे टाकायचे आहे.जर महिलेचा जन्म हा दुसऱ्या राज्यात झाला असेल तर हो असा पर्याय निवडा आणि महाराष्ट्रात झाला असेल तर नाही या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर अर्जदाराची बँक तपशील तुम्हाला भरायचे आहे. यामध्ये अकाउंट नंबर, बँकेचे नाव, आयएफसी कोड आधार कार्ड खात्याला लिंक आहे की नाही याची सविस्तर माहिती भरायची आहे.
त्यानंतर आता तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा हा पर्याय येईल.यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आधीवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि महिलेचा जन्म जर प्रांतात झाला असेल, तर त्याचा दाखलाही कागदपत्र अपलोड करायची आहेत.
आता सर्व कागदपत्र अपलोड केल्यावर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही मोबाईल कॅमेरा ऑन करुन लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे.
फोटो अपलोड केल्यावर तुम्हाला एक्सेप्ट हमीपत्र दिसेल यावर क्लिक करायचे आहे.तुम्ही अपलोड केलेली कागदपत्र तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचे आहे. आणि त्यानंतर सबमिट फॉर्म या बटणावर क्लिक करायचे आहे.
आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे.
अशा पद्धतीने तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होईल.
याव्यतिरिक्त अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या .