घटनाकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सर्वोच्च न्यायालयात 26 नोव्हेंबरला संविधान दिनी लोकार्पण…
26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणा घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबरला संविधान दिनी राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे. देशातील कोणत्याच न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकर यांचा पुतळा नाही. मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात पुतळा बसवण्यात येणार आहे.
26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. 7 फूट उंचीच्या या पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांनी वकिल पोशाख आणि हातात संविधानाची प्रत धारण केली आहे.
आंबेडकरी चळवळीशी ओळख असलेल्या वकिलांच्या गटाने केलेल्या सततच्या विनंतीमुळे व सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्ट आर्ग्युइंग कौन्सेल असोसिएशनने (SCACA) पुतळा बसवण्याची मागणीही केली होती. सततच्या विनंती मुळे डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
