क्रीडाअपडेटमहाराष्ट्रमुंबई

ग्लेन मॅक्सवेलचे दमदार द्विशतक…ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये.

Share this post

ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी द्विशतकामुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या हाताशी आलेला विजय हिरावून घेतला.अफगाणी गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी एकीकडे गुडघे टेकलेले असताना दुसरीकडे, मॅक्सवेलने एक बाजू लावून धरत चौकार-षटकारांची आतिषबाजी सुरूच ठेवली. त्याला कर्णधार पॅट कमिन्सने चांगली साथ दिली.

एकवेळ अशी होती की कांगारूंच्या सात विकेट्स केवळ ९१ धावांत पडल्या होत्या.अफगाणिस्तानने ग्लेन मॅक्सवेलचे चार झेल सोडत त्याला जीवदान दिले.त्याने हार मानली नाही आणि द्विशतक करत ऑस्ट्रेलिया अविश्वसनीय असा विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरी गाठली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *