अपडेटआर्थिक

ग्रॅच्युइटी बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय…

Share this post

केंद्र सरकानरने कॅबिनेट बैठकीत ग्रॅच्युइटीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारने ग्रॅच्युइटीसाठीची टॅक्स मर्यादा वाढवून २५ लाख रुपये केली आहे. आता या रकमेपर्यंत ग्रॅच्युइटी झाल्यास त्यावर कुठलाही टॅक्स द्यावा लागणार नाहीये. ही मर्यादा यापूर्वी २० लाख रुपये इतकी होती.

सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्स (CBDT)ने ८ मार्च २०१९ च्या नोटीफिकेशनमध्ये टॅक्स फ्री ग्रॅच्युइटी लिमिट १० लाखांहून वाढवून २० लाख करण्यात आलं होतं.

याशिवाय केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महागाई भत्ता देखील वाढवण्यास या बैठकीत मंजूरी देण्यात आली आङे. केंद्रीय कॅबिनेटने महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यास मंजूरी दिली आहे. आता कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळेल. हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२४ पासून लागू होईल.

मार्च अखेर पगारासोबत तो क्रेडिट केला जाईल. एकूण दोन महिन्याचा एरियर (arrears) देखील यामध्ये देण्यात येईल. लागोपाठ चार वेळा महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *