गुगल मॅपच्या चुकीमुळे ५० विद्यार्थी UPSC परीक्षापासून वंचित
देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रविवार दि. १६ जून रोजी पार पडत आहेत. परीक्षा केंद्र असलेल्या संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले, मात्र गुगल मॅपच्या (Google Map) चुकीमुळे त्यांना कॉलेज दुसऱ्याच ठिकाणी दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी केंद्रात घेण्यात आले नाही. शहरात जवळपास 50 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले.
देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रविवार दि. १६ जून रोजी पार पडत आहेत. परीक्षा केंद्र असलेल्या संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी दाखल झाले, मात्र गुगल मॅपच्या (Google Map) चुकीमुळे त्यांना कॉलेज दुसऱ्याच ठिकाणी दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला. त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी केंद्रात घेण्यात आले नाही. शहरात जवळपास ५० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले.
युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी संभाजीनगरमध्ये दाखल झाले. मात्र, गुगल मॅपच्या आधारे परीक्षेचे सेंटर शोधणाऱ्या अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना परीक्षेला मुकावे लागले. विवेकानंद कॉलेजचा पत्ता प्रत्यक्ष ठिकाणापासून गुगल मॅपवर १५ किमी दूर अंतरावर दाखवल्याने अनेक उमेदवार त्या ठिकाणी पोहोचले मात्र, तिथ गेल्यानंतर समजले असे कोणतेही ठिकाण येथे नाही. त्यानंतर पुन्हा मुळ पत्तावर जाण्यासाठी उशीर झाल्याने त्यांना परीक्षेपासून मुकावे लागले.
परीक्षेसाठी जे सेंटर देण्यात आले ते कॉलेज गुगल मॅपवर दाखवत नाही. आताही लोकेशन फेच करत नाहीय, असे विद्यार्थ्याने म्हटले आहे. मुले अभ्यास करून केवळ गुगल मॅप किंवा प्रशासनाच्या छोट्या छोट्या चुकांमुळे परीक्षेपासून वंचित राहिले. बाहेर गावाहून येणाऱ्यांना शहर माहिती नसते. त्यामुळे गुगल मॅपवर दाखवले त्याप्रमाणे जातात तेव्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर ते सेंटर नसल्याचे लक्षात येते. जवळपास ५० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
एका विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, बरेचं विद्यार्थी बाहेरगावाहून आले, त्यामुळें परीक्षा केंद्राचा पत्ता गुगलवर शोधला. विवेकानंद आर्ट्स, सरदार दलीप सिंग कॉमर्स एॅन्ड सायन्स कॉलेज, समर्थनगर संभाजीनगर असा पत्ता होता. गुगलला टाकल्यानंतर इथून २० किमी लांब वडगाव एमआयडीसीतील लोकेशन दाखवण्यात आले. विद्यार्थी तिथे पोहोचले तेव्हा समजले आपला पत्ता चुकला आहे. तिथून पुन्हा या काॅलेजवर यायला दोन मिनिट उशीर झाल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला.
