खोकल्यासाठी ३ घरगुती उपाय.
खोकल्यामुळे खूप लोकांना त्रास होतो. साधारण खोल्याचे दोन प्रकार असतात.
१)एक कोरडा खोकला तर २) दुसरा ओला खोकला.
जर आपल्याला साधारण कफ आणि खोकल्यापासून सुटका हवी असेल तर काही घरगुती उपाय करून पाहा. या उपायांमुळे नक्कीच आपल्याला मदत मिळेल.
( खोकला जास्त असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा.)
१) पुदिना आणि तुळशीच्या पानांचा चहा –
आपण पुदिना व तुळशीच्या पानांचा चहा तयार करून पिऊ शकता. हा उपाय केल्यावर आपणास खोकल्यापासून आराम मिळू शकतो, तसेच यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
२) मध आणि लवंग –
मध आणि लवंगामुळे खोकल्यापासून आराम मिळू शकतो, जर आपल्याला कफ आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर, यासाठी एका वाटीत मध घ्या, त्यात एक किंवा दोन लवंगा बारीक करून एकत्र करा. तयार पेस्ट दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे खोकल्यापासून आराम मिळू शकतो.
३) आलं आणि मध –
आल्यामधील दाहक-विरोधी गुणधर्म संसर्गामुळे होणारा त्रास कमी करण्याचे काम करते. यासाठी एका वाटीत मध घ्या, त्यात बारीक करून घेतलेलं आलं घालून मिक्स करा हि पेस्ट दिवसातून २ वेळा खा. यामुळे नक्कीच आराम मिळू शकतो.