शिक्षकाला आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस
एक सार्वजनिक कार्यक्रमात खासदार आमदाराला शुभेच्छा देताना एका शिक्षकाचे फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी गटविकास अधिकारी यांनी आचार संहितेचा भंग झाला असल्याचे म्हणत शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणूक 2024 संदर्भाने आचार संहिता लागू झाली आहे. सदर आचार संहितेच्या काळात कोणत्याही पदाधिकाऱ्याचा किंवा पक्षाचा प्राचार करणे किंवा त्यांचा सत्कार करणे हा आचार संहिता संहितेया भंग आहे. १९ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यक्रमात खासदार व आमदारांना शुभेच्छा देताना आपला फोटो व्हायरल झाला आहे. एका राष्ट्रीय पक्ष्याचा कार्यक्रमात खासदार व आमदारांना शुभेछा देताना आचार संहितेचा भंग केल्याचे निदर्शनास येत आहे.
आचार संहितेचा भंग केल्यामुळे आपल्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये. याबाबताचा खुलासा 21 ऑक्टोबरपर्यंत माझ्या समक्ष सादर करावा. खुलासा असमाधानकारक असल्यास किंवा अप्राप्त असल्यास आपले काही म्हणणे नाही असे समजुन आपला शिस्तभंगाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल याची गांर्भियाने नोंद घ्यावी, असे कारणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे.