क्रिकेटमध्ये आला नवा नियम – Stop Clock, बॉलर्सचं टेन्शन वाढणार…
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) मंगळवारी वनडे क्रिकेट आणि टी-ट्वेंटी फॉरमॅटसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.
या नियमांमध्ये एका नव्या नियमाचा समावेश करण्यात आला आहे. स्टॉप क्लॉक असं या नियमाला नाव देण्यात आलं आहे. आयसीसीच्या सामन्यात पुरुष गटात एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये चाचणी आधारावर याची अंमलबजावणी केली जाईल. त्यानंतरच हा नियम सर्वत्र लागू करण्यात येईल, असं आयसीसीकडून जाहीर करण्यात आलं आहे.
नेमका काय आहे नियम –
गोलंदाजी करणाऱ्या संघाला षटकांच्या सुरुवातीमध्ये फक्त 60 सेकंद म्हणजेच एक मिनिट लागू शकतो. 60 सेकंदांची वेळ मर्यादा तीनदा ओलांडल्यास, फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 पेनल्टी धावा लागू केल्या जातील, असा आयसीसीचा नवा स्टॉप क्लॉक (Stop Clock) नियम आहे.
आयसीसीच्या हा नवा नियम ट्रायल आधारावर सामील करण्यात आला आहे. याची चाचणी डिसेंबर 2023 पासून सुरू होईल, जी एप्रिल 2024 पर्यंत चालणार आहे. बैठकीनंतर बोर्डाने वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये नवीन नियम लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. प्रत्येक संघाला मागील षटक संपल्यानंतर 60 सेकंदात पुढील षटक सुरू करावे लागतील, असं आयसीसीने (ICC) एका निवेदनात म्हटलं आहे.
ICC Board announce new hosts for Men's U19 Cricket World Cup 2024 👀
— ICC (@ICC) November 21, 2023
More ⬇️

