कॉल रेकॉर्डिंगबाबत हायकोर्टाचा निकाल…
छत्तीसगड उच्च न्यायालयाने मोबाइल कॉल रेकॉर्डिंग करणे नियमांचे उल्लंघन मानले आहे. आयटी कायद्याच्या कलम ७२ नुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पती किंवा प्रियकर आपल्या प्रेयसी किंवा पत्नीचा कॉल रेकॉर्ड करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.हे घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन आहे.
आयटी कायदा २००० च्या कलम ७२ अंतर्गत, कोणतीही व्यक्ती परवानगीशिवाय इलेक्ट्रॉनिक उपकरणावर कोणतेही वैयक्तिक संभाषण रेकॉर्ड करू शकत नाही. तसेच सार्वजनिक करू शकत नाही असे करणे हे गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन आहे.यापूर्वी सुप्रीम कोर्टानेही कॉल रेकॉर्डिंग प्रकरणात गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा उल्लेख केला आहे.