केंद्र सरकारने दिली नव्या पेन्शन योजनेला मंजुरी(Unified Pension Scheme)
केंद्र सरकारच्या या योजनेचे नाव आता युनिफाईड स्पेशल स्कीम (Unified Pension Scheme) असे आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या नव्या पेन्शन योजनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या योजनेनुसार जर एखाद्या व्यक्तीने कमीत कमी 25 वर्ष काम केले, तर त्याला त्याच्या निवृत्तीच्या आधी नोकरीमध्ये बारा महिन्यांपर्यंत बेसिक पे वर 50% पेक्षा अधिक पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच त्या व्यक्तीने दहा वर्ष नोकरी केली. आणि त्यानंतर सोडली तर त्याला दर महिन्याला 10 हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे एखाद्या पेन्शन धारकाचा जर मधेच मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही पेन्शनची रक्कम मिळणार आहे. त्या व्यक्तीच्या कुटुंबाला 60% रक्कम दिली जाणार आहे.
जर एखाद्या कर्मचारी 10 वर्ष नोकरी करून नोकरी सोडत असेल, तर त्याला महिन्याला 10 हजार रुपये एवढी पेन्शन देण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिलेली आहे.
या एका मोठ्या निर्णयानंतर आता केंद्र सरकारच्या जवळपास 23 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. आता कर्मचाऱ्याकडे एनपीएस किंवा यूपीएस यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचा मार्ग असणार आहे. तसेच त्यांना या योजनेअंतर्गत महागाई भत्त्याचा देखील लाभ होणार आहे.
सरकारने या योजनेला मंजुरी दिली असली, तरी अजूनही योजना लागू झालेली नाही. येत्या काळात लवकरच ही योजना लागू केली जाईल. या योजनेचे पाच खांब असणार आहे. यामध्ये 50% सुनिश्चित पेन्शन मिळणार आहे. तसेच सुनिश्चित कौटुंबिक पेन्शन असणार आहे. तसेच दहा वर्षाच्या नोकरी नंतर दहा हजार रुपये महिना पेन्शन त्या व्यक्तीला मिळणार आहे.
जुनी निवृत्तीवेतन योजना सुरू करण्याची मागणी करणाऱ्या ‘नॅशनल मुव्हमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम’चे अध्यक्ष विजय कुमार बंधु यांनी सरकारच्या नव्या घोषणेवर प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारला जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय देण्यात काय अडचण येत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
पत्रकारांशी बोलतांना बंधु म्हणाले की, “जर सरकार नवीन निवृत्तीवेतन योजना आणि युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) चा पर्याय देत असेल तर मग जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा (OPS) पर्याय देण्यात काय हरकत आहे? जर UPS मध्ये सरासरी रकमेच्या 50 टक्के देत असेल तर OPS मध्ये 50 टक्के भरावे लागतील.”
याबाबत ‘नॅशनल मिशन फॉर ओल्ड पेन्शन स्कीम’चे राष्ट्रीय अध्यक्ष मंजीत सिंह पटेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, ‘ही नवीन व्यवस्था एनपीएसपेक्षा जास्त खराब असेल, “सरकारने आपले योगदान 18.5 टक्के केले आहे. ज्यांनी 25 वर्ष सेवा केली त्यांना 50 टक्के निवृत्तीवेतन म्हणजेच जुन्या निवृत्तीवेतनाच्या बरोबरीने दिले जाईल. तर, ज्यांचा सेवाकाळ कमी असेल त्यांना 10 हजार आणि डीआर दिला जाईल आणि आमचं 10 योगदानही ठेवून घेणार. फक्त शेवटच्या सहा महिन्यांचा पगार परत केला जाईल.याचाच अर्थ ही व्यवस्था NPS पेक्षाही खराब व्यवस्था असणार आहे, कारण जे कोणी इतके दिवस काम करतील त्यांना UPS पेक्षा अधिक लाभ मिळेल.”

