अपडेटआर्थिकराष्ट्रीय

केंद्र सरकारची नव्या इन्कम टॅक्स स्लॅब विषयी घोषणा

Share this post

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग तिसऱ्यांदा आर्थिक अर्थसंकल्प सादर करत आहेत.

हा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या इन्कम टॅक्स स्लॅब विषयी एक घोषणा केलेली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता जुन्या प्रणालीनुसार कर भरणाऱ्या लोकांसाठी कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. नव्या कर प्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे आता जवळपास 17 हजार 500 रुपये वाचणार आहेत.

निर्मला सीतारामन यांनी केलेल्या नव्या करप्रणाली स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा ही आता 50 हजारांवरून 75 रुपये एवढी करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास 25 हजार रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन वाढवण्यात आलेला आहे. तसेच फॅमिली डीडक्शनची मर्यादा 15000 वरून 25 हजार रुपये एवढी वाढवण्यात आलेली आहे.

3 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही. त्याचप्रमाणे 3 लाख ते 7 लाख रुपये दरम्यान 5 टक्के कर भरावा लागणार आहे. तसेच 7 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी 10 टक्के कर भरावा लागणार आहे. तसेच 10 लाख ते 12 लाख उत्पन्नावर 15 टक्के कर भारावा लागणार आहे. त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी केलेल्या नवीन घोषणेनुसार आता 12 लाख ते 15 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना 20 टक्के कर भरावा लागणार आहे. तसेच 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांना 30 टक्के एवढा कर भरावा लागणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *