अपडेटइतर

केंद्र सरकारचा निर्णय, रेशनकार्डवर तांदळाऐवजी मिळणार नऊ जीवनावश्यक वस्तू

Share this post

केंद्र सरकारकडून नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना आणि गरजू लोकांसाठी आहेत.

रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते. मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता.

मात्र, आता यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार रेशनवरील तांदूळ बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी इतर नऊ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाल्यांचा समावेश आहे.

लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल, अशी सरकारला आशा आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *