अपडेटशैक्षणिक

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू…

Share this post

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET जुलै 2024) अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेत बसू इच्छिणारे उमेदवार CBSE CTET च्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. उमेदवारांना येत्या 2 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.

सामान्य, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी एका पेपरसाठी अर्ज केल्यास 1000 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी अर्ज केल्यास 1200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर एका पेपरसाठी अर्ज करणाऱ्या SC, ST आणि PwD उमेदवारांना 500 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी अर्ज केल्यास 600 रुपये शुल्क भरावे लागतील.

CBSE द्वारे 7 जुलै 2024 रोजी नियुक्त परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल. पेपर II सकाळी 9:30 ते दुपारी 12 आणि पेपर I दुपारी 2 ते 4:30 या वेळेत घेण्यात येईल.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *