ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासन देणार 60000 रुपये,जाणून घ्या योजना…
सरकार इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करणार आहे.
वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार कडून रक्कम दिली जणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे , पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या वतीने 60 हजार अनुदान दिले जाणार आहे.
तसेच क वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासाठी 51 हजार दिले जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४३ हजार दिले जाणार आहे. यांसोबतच तालुकाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 38 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. याबाबत शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.
वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता योजना सुरु करण्यास मंत्रिमंडळाने 19.10.2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.
या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून 600 ओबीसी विद्यार्थी आधार योजनेसाठी मेरिट प्रमाणे निवडले जाणार आहेत. राज्य भरात एकून 21 हजार 600 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्त दिला जाणार आहे.


