अपडेट

ओएनजीसीमध्ये २००० हून अधिक पदांची भरती

Share this post

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ONGC) मेगाभरती जारी केली आहे. तब्बल २२३६ रिक्त पदांसाठी ही भरती जारी करण्यात आली आहे.

ओनजीसीमध्ये अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार असून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत इच्छुक उमेदवारांना NAPS पोर्टल apprenticeshipindia.gov.in किंवा NATS पोर्टल nats.education.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज करावा लागणार आहे. तसेच २५ ऑक्टोबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.

उमेदवारांनी १०वी/१२वी / ITI/ डिप्लोमा / बीएससी / बीई / बीटेक / बीबीए पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच १८ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ई मेल आयडीवर याबाबत माहिती देण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करुन निवड केली जाणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी पात्र उमेदवारांना ९ हजार रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. आयटीआय पदवी प्राप्त उमेदवारांनी ८०५० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे. तसेच ट्रेड अप्रेंटिससाठी ७००० रुपये स्टायपेंड दिली जाणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *