अपडेटराष्ट्रीयशैक्षणिक

ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या खोट्या फसव्या जाहिराती करणाऱ्या परदेशी विद्यापीठांवर होणार कारवाई…

Share this post

ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या फसव्या जाहिराती करणाऱ्या परदेशी विद्यापीठांवर कारवाईचा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगानं दिला आहे. परदेशी विद्यापीठासाठी देशात कॅम्पस सुरू करण्यासाठी नियम यूजीसीनं प्रसिद्ध केलं आहेत. त्यानंतर आता यूजीसीनं यासंदर्भात नवीन अधिसूचना काढली आहे.

आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही परदेशी उच्च शैक्षणिक संस्था अथवा कोणत्याही फ्रँचायझी व्यवस्थेंतर्गत भारतात अभ्यासक्रम सुरू करू शकत नाही. तसंच अशा अभ्यासक्रमांना यूजीसीद्वारे मान्यता दिली जाणार नाही, असंही अधिसूचनेत म्हटलं आहे. याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही युजीसीनं दिला आहे. विद्यार्थ्यांनी ही सजग राहण्याचं आवाहन युजीसीनं केलं आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *