एसटीचे तिकीट आता मिळणार कॅशलेस…
यूपीआय चे क्यूआर कोड स्कॅन तंत्रज्ञानाच्या बाबतीत राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा एक पाऊल मागे होती. परंतु, आता ‘एसटी’चे तिकीटही कॅशलेस होणार आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता बसमध्येच कॅशलेस व्यवहारांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.एसटीमधील वाहकांच्या हाती नवे अँड्रॉइड बेस ईटीआय मशीन दिले जाणार आहे. त्याद्वारे प्रवाशांना यूपीआय चे क्यूआर कोड स्कॅन स्वरूपात पैसे अदा करून तिकीट घेता येणार आहे. व पुढील टप्प्यात डेबिट व क्रेडिट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
व्यवहार करताना कोणतेही ट्रांजेक्शन फेल झाल्यास क्रमांक एअरटेल द्वारे 400 व व इतर मोबाईल क्रमांकाद्वारे 8800688006 या क्रमांकास संपर्क करता येणार आहे.


