एलएलबीच्या सीईटीसाठी पुन्हा १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ…
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) पाच वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी १५ एप्रिलपर्यंत cetcell.mahacet.org या संकेतस्थळावरर अर्ज करू शकतात.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. उमेदवार व पालकांकडून विधी ५ वर्ष अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार लक्षात घेवून महा-एल.एल.बी (५ वर्ष) सीईटी २०२४ साठी अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सीईटी सेलने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.


