एकूण ४९६ – ज्युनियर एक्झिक्युटिव्हज पदांसाठी जाहिरात.
एअरपोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) (पब्लिक सेक्टर एंटरप्राईज), नवी दिल्ली (ADVT. No.०५/२०२३).अजा:७५, अज:३३, इमाव:१४०, ईडब्ल्यूएस:४९, खुला:१९९, ५ पदे दिव्यांग कॅटेगरी ‘सी’ साठी राखीव
शैक्षणिक पात्रता :बी.एस्सी.- फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषयांसह उत्तीर्ण किंवा इंजिनीअरिंगमधील कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. (किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण) पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना कागदपत्र पडताळणी वेळी पदवी उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
वयोमर्यादा – दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी २७ वर्षे. (वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).
अर्जाचे शुल्क – रु. १,०००/-. (अजा/ अज/ महिला/ दिव्यांग उमेदवार आणि ज्यांनी AAI मध्ये १ वर्षांची अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली आहे, अशा उमेदवारांना फी माफ आहे.) ऑनलाइन परीक्षेची तारीख नंतर www. aai. aero या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. अंतिम निवड लेखी परीक्षेतील/ इंटरह्यूमधील गुणवत्तेनुसार केली जाईल. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्राफिक कंट्रोल) पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. त्यांना International Civil Aviation Organisation (ICAO) लँग्वेज एक्झिक्युटिव्ह लेव्हल- ४ (ऑपरेशनल) पात्रता मिळवावी लागेल.
ऑनलाइन अर्ज www. aai. aero या संकेतस्थळावर दि. १ नोव्हेंबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान उपलब्ध.
अधिक माहितीसाठी एअरपोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.