अपडेटदुर्घटनासोलापुर

उजनी धरण पात्रात प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली,७ जण बुडाल्याची माहिती

Share this post

उजनी धरण पात्रात सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कुगावहून कळाशी होऊन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जाणारी प्रवासी वाहतूक करणारी बोट (लांस ) बुडाली असून यामध्ये सात जण बुडाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. यातून एका जणाने पोहत आपला जीव वाचवला आहे.

कळाशी गावच्या हद्दीत उजनी पात्रात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कळाशीहुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीच्या बाबतीत अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.

या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण तीन पुरुष, दोन महिला, दोन लहान मुली असे प्रवासी आणि एक बोट चालक एकुण 8 जण प्रवास करत होते.. राहुल डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोहत कळाशी (ता.इंदापूर) या ठिकाणी आले आहेत.

सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वारे व पावसाने हजेरी लावल्याने या वादळी वाऱ्याच्या वेगाने आणि पाण्याच्या लाटांनी ही बोट पलटी झाली असल्याचा अंदाज आहे.घटना समजतात बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ पोहचले आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *