अपडेट

ई-केवायसी करा अन्यथा १ नोव्हेंबरपासून रेशन मिळणार नाही

Share this post

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब आणि गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनचे अन्न दिले जाते. सरकारने आता त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याची अट घातली आहे. ‘ई-केवायसी’द्वारे योजनेचे बनावट लाभार्थी शोधले जाऊ शकतात. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून, १ नोव्हेंबरपासून ज्यांनी ‘ई-केवायसी’ केले नाही त्यांचे धान्य देणे बंद केले जाईल आणि लाभार्थींचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांना रास्त भावात धान्य मिळावे यासाठी ‘e-Kyc’ अनिवार्य करण्यात आले आहे. अन्न आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने यापूर्वीच तशा सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक शिधापत्रिकाधारकांनी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अनेक लोक मोफत रेशन योजनेसाठी पात्र नसतानाही शिधापत्रिकेवर स्वस्त धान्य खरेदी करतात.

असे अनेक लोक आहेत जे आता या जगात नाहीत, ज्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र तरीही त्यांची नावे शिधापत्रिकेत आहेत. तर दुसरीकडे बनावट शिधापत्रिका घेऊन सरकारी योजनांचा लाभ घेणारेही आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच ज्यांचे नाव कौटुंबिक शिधापत्रिकेत नोंदणीकृत आहे, त्यांना ‘ई-केवायसी’ करावे लागणार आहे. यासाठी ते त्यांच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. ज्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांनी मुदतीत ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *