अपडेटदुर्घटनानाशिक

इगतपुरीकडे जाणारी मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले, कसारा-नाशिक वाहतूक ठप्प…

Share this post

इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कसाराहून इगतपुरी आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे.

कसाराहून इगतपुरी व नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही मालगाडी कल्याणहून कसारामार्गे नाशिकच्या दिशेने जात होती. कसारा स्थानकातून इगतपुरी च्या दिशेने जात असताना 500 मीटर अंतरावर मालगाडी चे डब्बे रुळावरून घसरले आहे. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे.

रेल्वे मार्गावरून घसरलेले डबे हटवण्याचं काम रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे. मात्र यासाठी किती वेळ लागेल हे सांगण्याची शक्यता कमी असल्यामुळे या मार्गावरील वाहतून अन्य मार्गाने वळवण्याची शक्यता आहे. दरम्यान अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *