इंडिया पोस्ट पेमेंट बँक बाबत संपूर्ण माहिती…
सामान्य लोकापर्यंत बँकिंग सेवा पोहचावी या उद्देशाने India Post Payment Bank (इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक) 1 सप्टेंबर 2018 रोजी सुरु करणेत आली.
भारतीय पोस्टल विभागाची india post ही पेमेंट बँक पोस्ट ऑफिसच्या नेटवर्कद्वारे आणि सुमारे 3 लाख पोस्टमन व ‘ग्रामीण डाक सेवकांच्या’ माध्यमातून कार्य करते,इतर बँकांप्रमाणे आयपीपीबीमार्फत कर्ज व क्रेडिट कार्ड जारी केले जात नाही.
आयपीपीबीमार्फत बँकिंग सेवा :
1.ठेवी (Deposits) 2.प्रेषण सेवा (Remittance services) 3.मोबाइल पेमेंट / हस्तांतरण (Transfers) / खरेदी आणि एटीएम / डेबिट कार्ड 4.नेट बँकिंग 5.तृतीय-पक्ष निधी हस्तांतरण (Third-party fund transfers) या कर्ज आणि विमा सुविधा पंजाब नॅशनल बँक आणि बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्समार्फत पुरविल्या जातात.
आयपीपीबीच्या सुविधा :
१. नियमित बचत खाते: नियमित बचत खाते बँकेमध्ये अथवा ग्राहकाच्या घरीही जाउन् उघडले जाऊ शकते,पैसे जमा करण्यासाठी आणि पैसे पाठविण्यासाठी वापरले जाऊ शकते,याव्यतिरिक्त, या खात्यात ठेवलेल्या पैशावर ४% प्रतिवर्ष या दराने व्याजही मिळते.2 लाखापर्यत रक्कम ठेवता येते, मोबाईलवर पोस्ट पेमेंट बँकेचे ॲप घेऊन ऑनलाइन पैसे पाठवणे, बिल पेमेंट करणे तसेच पोस्ट ऑफिसच्या इतर सुविधासाठी ऑनलाईन रिक्वेस्ट्ट टाकून डोर स्टेप बँकिंगचा लाभ घेऊ शकता व घरातच पैसे व्आधार अपडेट व लहान मुलाचे आधार मिळू शकते.
२. डिजिटल बचत खाते : अठरा वर्षाच्या वरील व्यक्ती आयपीपीबी ॲपच्याच्या मदतीने घरातूनच खाते उघडू शकते, हे खाते विनामूल्य उघडता येते,पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सहा महिन्याच्या आत केवायसी करून घ्यावी लागते या खात्यावर 2.लाखापर्यंत व्यवहार करू शकतात.१) या खात्यावर 4% वार्षिक व्याज मिळते. २) रुपये 2.लाखापर्यंत रक्कम ठेवू शकता. ३)डिजिटल पासबुक मिळते. ४)डोर स्टेप बँकिंग(आवश्यकतेनुसार पोस्टमनच्या माध्यमातूनविनंतीनुसार पैशाची उपलब्धता) ५)बिल पेमेंट सुविधाक्यूआर कार्डसह सोपी आणि सुरक्षित बँकिंग सुविधा–ग्राहकांच्या सोयीसाठी बहुभाषिक ग्राहक सेवाशून्य शिलकीसह (Zero balance ) खाते.
३. चालू खाते (Current Account): आयपीपीबीतर्फे लहान व्यापारी / किरणा स्टोअर आणि वैयक्तिक व्यावसायिकांना चालू खात्याची(Current Account) सुविधा दिली जाते.आयपीपीबीतर्फे एक व्यापारी अॅप देखील जारी केले गेले आहे.पोस्टमॅन / जीडीएसद्वारे, पोस्ट ऑफिस काउंटरवर किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी चालू खाते उघडता येते.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खात्यासाठी लागणारे कागदपत्रे :
आधार कार्ड, पॅन कार्ड, ओटीपी साठी मोबाईल,
India Post payment Bank IFSC code इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा आयएफएससी कोड नंबरIPOS0000001(संपूर्ण भारतासाठी एकच आयएफएससी कोड)
India Post payment Bank customer care number इंडिया पोस्ट पेमेंट बँक कस्टमर केअर नंबर1800-8899-860,155299.
India post payment Bank Customer id इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक कस्टमर आय.डी.IPPB चे खाते उघडताना संबधित पोस्टमन कस्टमर आय.डी. लिहून देतो.किंवा 155299 या नंबर ला फोन लावून मिळतो.
India post payment Bank insurance. या पोस्ट पेमेंट बँक बँक विमा योजना.या खात्यावरून रुपये 299 व रुपये 396 व 399 मध्ये दहा लाखाचा विम्याचा लाभ घेता येतो.
India Post payment Bank balance check इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा बॅलन्स कसा चेक करायचा.8424046556 या नंबरवरूनकिवा मोबाईलवरील अँप् वरून India post payment Bank account opening online इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे ऑनलाईन खाते कसे काढायचे मोबाईल वरती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे ॲप घ्यावे त्यामध्ये आपले आधार पॅन नंबर टाकून झिरो बॅलन्स खाते उघडू शकता, पण ई केवायसी साठी पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागते.
India post payment Bank helpline number इंडिया पोस्ट पेमेंट बँक हेल्पलाइन नंबर 155299


