इंग्लंडच्या टीमचा 347 रन्सने पराभव,टीम इंडियाच्या महिलांनी रचला इतिहास…
महिलांच्या टीम इंडियाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा 347 रन्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
टीम इंडियाच्या मुलींनी इंग्लंडला विजयासाठी 479 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. यावेळी प्रत्युत्तरात इंग्लंडचे सर्व फलंदाज 131 रन्सवर आऊट झाले. भारतीय महिलांनी प्रथमच मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना जिंकला आहे.इंग्लंड विरूद्ध झालेल्या या एकमेव टेस्ट सामन्यात टीम इंडियाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने दोन्ही डावात चमकदार कामगिरी करत 87 रन्स केले. याशिवाय तिने 9 विकेट्सही घेतल्या. या सामन्यातील विजयी कामगिरीसाठी तिला मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं.
टीम इंडियाने पहिल्या डावात 428 रन्स केले होते. याविरूद्ध इंग्लंडने दोन्ही डावात मिळूनही इतके रन्स केले नाही. इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांवर आटोपला. त्याचवेळी दुसऱ्या डावात इंग्लंडची टीम केवळ 131 धावांत गडगडली. या सामन्यात इंग्लंडच्या नॅट सीव्हर ब्रंटने टीमसाठी सर्वाधिक म्हणजेच 59 रन्स केले.
