अपडेटक्राईम

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल…

Share this post

मोखाड्यातील कारेगांव शासकीय आश्रमशाळेतील रूद्राक्ष पागी या नववीतील विद्यार्थ्यांला लाडु घेतल्याच्या कारणावरून तेथील शिक्षकाने काठीने अमानुष मारहाण केली होती.

अधिक माहिती नुसार, मोखाड्यातील कारेगांव शासकीय आश्रमशाळेत 12 जानेवारी ला दुपारच्या जेवणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी झुंबड केली होती. यावेळी नववीत शिक्षण घेत असलेल्या रूद्राक्ष पागी या विद्यार्थ्यांच्या हातात दोन लाडु आढळल्याने, तेथील ललित अहिरे या शिक्षकाने ओल्या बांबुच्या काठीने रूद्राक्ष ला अमानुष मारहाण केली.त्यामुळे रूद्राक्ष जमीनीवर खाली कोसळला, त्याच्या छाती, मान आणि पाठीवर बांबुचे लाल व्रण ऊमटले होते. त्याला त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांनी कारेगांव येथील आरोग्य पथकात नेऊन ऊपचार केले.

या बातमी ची दखल घेत विविध सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी कारेगांव आश्रमशाळेला भेट दिली तसेच करोळ या गावी जाऊन विद्यार्थ्यांची सहानुभूती पुर्वक चौकशी केली. त्यानंतर स्थानिक पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले.

अखेर 18 जानेवारी ला रूद्राक्ष चे वडिल दत्ता पागी यांनी ललित अहिरे या शिक्षका विरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पालकांच्या तक्रारी वरून मुलास मारहाण आणि अल्पवयीन मुलांची काळजी व संरक्षण कायद्यान्वये मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *