आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची समर्थकांसह मुंबईच्या दिशेने पदयात्रा…
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून समर्थकांसह मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे.
मुंबईत प्रजासत्ताक दिनी पोहोचून मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. आधी जरांगेंनी मुंबईत येऊन बेमुदत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. पण आता जरांगेंनी शनिवारपासूनच बेमुदत उपोषण करण्याचा विचार बोलून दाखवला.
जालना ते मुंबई साधारण 400 किलोमीटरचा अंतर आहे आणि ते दररोज 20 किमी चालणार असून त्यांच्यावर आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत संपली असून, आजपासून मनोज जरांगेसह लाखो मराठे मुंबईकडे कूच करणार आहे. विशेष म्हणजे मुंबईकडे जाताना अंतरवाली सराटीमधूनच आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. जर, उपाशीपोटी आंदोलकांनी मुंबईपर्यंत प्रवास करणं शक्य नाही, आणि तसं झाल्यास काही दुर्दैवी घटना घडू नये, अशी अपेक्षा आहे. मात्र जरांगे यांचे या घोषणेमुळे सरकारची अडचण वाढणार आहे.
मनोज जरांगे म्हणाले की,राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. करोडोच्या संख्येने लोक एकत्र येत आहेत, 250-300 आत्महत्या झाल्या आहेत. ततरीही सरकार निर्णय घेत नाही. एवढं निर्दयी सरकार असू शकत, ज्या मराठ्यांनी त्यांना गादीवर बसवलं, त्यांना हक्काचं आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे आता यांचा राजकीय सुपडासाफ केल्याशिवाय राहायचं नाही. एवढा निर्दयीपणा आमदार, खासदारामध्ये असू शकतो. मी समाजात असेल नसेल, मराठ्यांनी एकजूट तुटू देऊ नका असे म्हणत जरांगे भावूक झाले.
