दुर्घटनायवतमाळ

आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्याचा डोहात बुडून मृत्यू , कुटुंबास घातपाताचा संशय…

Share this post

यवतमाळ शहरातील रंभाजीनगरात असलेल्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याचा किटा (कापरा) येथील डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच खळबळ उडाली. विद्यार्थ्याच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत आदिवासी विभागाच्या दुर्लक्षित धोरणावर ताशेरे ओढले.

कार्तिक पुंडलिक मेश्राम (वय 17, रा. दहेगाव, ता. राळेगाव), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता बारावी विज्ञान शाखेत अमोलकचंद विद्यालयात शिक्षण घेत होता. इयत्ता अकरावीत प्रवेश घेतल्यापासून आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात निवासी राहत होता. कार्तिक वसतिगृहातील मुलांसह बाहेरच्या विद्यार्थ्यांसह बाहेर गेला होता.

दरम्यान त्याचा किटा (कापरा) येथील डोहात मृतदेह आढळून आला. मुलाचा मृत्यू संशयास्पद असून, या घटनेस जबाबदार असलेल्या सोबतच्या व्यक्तींची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी पुंडलिक बाजीराव मेश्राम (वय 46, रा. दहेगाव) यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

या घटनेमुळे आदिवासी विभागाच्या वतीने चालविण्यात येणार्‍या वसतिगृहातील दुर्लक्षीत कारभार चव्हाट्यावर आला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे ठाणेदार प्रशांत कावरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *