आदिवासी विकास विभाग अंतर्गत 614 पदांसाठी भरती
आदिवासी विकास महामंडळ येथे एक मोठी भरती निघाली आहे. या भरती अंतर्गत वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ.एकूण 614 रिक्त जागा आहेत.
रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 12 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 2 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करावी लागेल.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.