आरोग्यअपडेट

अ‍ॅसिडिटीवर मिळवा घरगुती उपायांनी आराम…

Share this post

बऱ्याचवेळा जेवण केल्यानंतर अपचन, आंबट ढेकर, उलट्या यासारख्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर ही सर्व अ‍ॅसिडिटीची लक्षणं असू शकतात. घरी राहून काही घरगुती उपाय करून अ‍ॅसिडिटीवर आराम मिळवू शकतात.(जास्त त्रास होत असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

थंड दूध प्या : अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी एक ग्लास थंड दूध प्या. या उपायाचा अवलंब करून तुम्हाला अ‍ॅसिडिटीपासून त्वरित आराम मिळू शकतो.

ओवा खा : ओवाचं सेवन केल्यानं अ‍ॅसिडीटी आणि गॅस पासून आराम मिळतो. तसेच पचनासाठी देखील ओवा चांगला मानला जातो.

ताक प्या : ताकामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असतं, ज्यामुळं पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. ताक प्यायल्यानं पोटाची उष्णता शांत होते.

बडीशेप पाणी :  बडीशेपचं पाणी प्यायल्यानं अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होते. हे पाणी तयार करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप घाला. सुमारे 30 मिनिटांनंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. पाणी थंड झाल्यावर ते प्या.

पुदीनाची पाने : अ‍ॅसिडिटी, गॅस, अपचन यांसारख्या तक्रारींवर पुदिन्याची पाने रामबाण उपाय मानली जातात. अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्यास पुदिन्याची पाने चावून खा.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *