अषित प्राथमिक शाळा पवनी येथे विद्यार्थी दिन साजरा…
७ नोव्हेंबर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा त्यांच्या सन्मानार्थ विद्यार्थी दिवस रोजी साजरा केला जातो.
पवनी :- ७ नोव्हेंबर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन, अषित प्राथमिक शाळा पवनी येथे विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला..
शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थितांनी डॉ.बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
शाळेतील उपक्रमशील शिक्षक ए.आर.गिरी यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास व त्यावेळी त्यांना किती संकटावर मात करावी लागली याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली दिलेल्या माहितीवर आधारित एकुण पाच प्रश्नांची प्रश्नमंजुषा स्पर्धा यावेळी घेण्यात आली.
सदर कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक पी.डी.भोयर,एम.एम.जिवतोडे, अर्चना रामटेके, विजुमाला साखरकर,करुना वाघमारे, मिनाक्षी सुपारे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
