अषित प्राथमिक शाळा पवनी येथे, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न…
पवनी:-दि.१९/येथील अषित प्राथमिक शाळा पवनी येथील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी.जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील शिक्षक पी.डी.भोयर,ए.आर.गिरी,एम.एम.जिवतोडे,अर्चना रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शाळेतील विद्यार्थी अंश कुंभरे,सौम्य बिसने,धृव रामटेके,किंसुक मेश्राम,आर्वशी सोनकुसरे आदी विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्सव निमित्त अप्रतिम अशी भाषणे दिली.तसेच काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गितगायन व कथाकथन उत्तम प्रकारे सादर केले.शेवटी “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” या राज्य गिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन मुरलीधर जिवतोडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका विजुमाला साखरकर, करुणा वाघमारे,सविता गणवीर,सत्यभामा वाघमारे व शालेय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.